
भोर-चंद्रकांत जाधव… भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालयाचे माजी प्राचार्य व जेष्ठ पत्रकार डी.जी सहस्त्रबुद्धे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.
डी.जी सहस्त्रबुद्धे यांची राजा रघुनाथराव विद्यालयात ३४ वर्षे सेवा झाली होती ते काही काळ भोर नगर परिषदेत नगरसेवक होते तर भोर तालुका पत्रकार संघ स्थापना करण्यात त्यांचा मोठा वाटा होता त्यांनी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिले त्यांच्या पश्चात दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांचा एक मुलगा सचिन हा मंत्रालयात कक्ष अधिकारी आहे.
डी.जी सहस्त्रबुद्धे यांच्या पार्थिवावर भोर येथील अमरधाम स्मशानभूमी अंतिम विधी करण्यात आला.यावेळी विविध क्षेत्रातील अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.

