
भोर-चंद्रकांत जाधव.. भोर तालुक्यातील ग्रामीण भागात वीज ग्राहकांना रीडिंग घेणाऱ्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांकडून रीडिंग व्यवस्थित घेत नसल्याने ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना वीज मंडळ ४४० चा होल्टेज देत असल्याने ग्रामीण विजधारक आता रस्त्यांवर येण्याची भाषा करत आहे. आम्हाला विज बिल येते त्यामध्ये अनेक त्रुटी असतात अवाढव्य वीज बिल येते पण वीज कार्यालयातील कर्मचारी या कडे लक्ष न देत नाहीत तसेच कोणाचे म्हणने ऐकून घेत नाहीत त्यामुळे आमच्यावर अन्याय होतो त्यामुळे खानापूर (ता.भोर) येथील ग्राहक दीपक बाजीराव गोळे यांनी उपकार्यकारी अभियंता वीज वितरण विभाग भोर यांना मंगळवार (दि.२२) ) रोजी निवेदन दिले आहे. तर स्मार्ट मीटर बसवा असा फुकटचा सल्ला देतात.
मागील तीन महिन्यांपासूनचे मीटर रीडिंग घेतल्याने मला चुकीचे बिल येत आहे. अशीच स्थिती भोरच्या ग्रामीण भागात असल्याचे दीपक गोळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. मंगळवार हा भोरचा आठवडे बाजार असतो.त्यामुळे वीज ग्राहक या कामासाठी कार्यालयात येतात पण कर्मचारी त्यांचे निरसन करत नाहीत भोर ग्रामीण विभागांमध्ये जवळपास नऊ ते दहा हजार वीज ग्राहक आहेत. याचा विचार अधिकारी कधी करणार ?हा खरा प्रश्न आहे याकडे दुर्लक्ष झाल्यास आता रस्त्यांवर येण्याचा पर्याय ग्राहकांनी घेतला आहे.

