
भोर-चंद्रकांत जाधव) : राजगड कारखाना नव्याने उभा राहिला पाहिजे. कधी उभा राहणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.आपल आपलच असत धुराड पेटल नसल्याने शेतकरी हवादिल झाला आहे. शेवट कधी कधी होणार पण लवकरच होणार असे राजगड कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

राजगड सहकारी कारखाना अनंतनगर निगडे (ता. भोर ) च्या ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी दि. २८ रोजी दुपारी एक वाजता संपन्न झाली. त्यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक अहवाल वाचून कार्यक्रम पत्रिकेतील सर्व विषयांना सभासदांच्या संमतीने मंजूरी देण्यात आली . याप्रसंगी राजगड कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे बोलत होते. त्यावेळी बोलताना थोपटे म्हणाले, राजगड संचालकमंडळ कार्यकाल २०२५-२६ मुदत संपत आहे. शासनाचे निवडणूकीसाठी क्रियाशील व अक्रियाशिल अटीशर्ती घालून दिल्या आहेत.आगामी निवडणूकीत ऊस उत्पादक संचालकासाठी सलग तीन वर्ष ऊस घालून उत्पादक सभासद असला पाहिजे मात्र सन २०२२-२३ ,२३-२४ ,२४-२५ , चालू २५-२६ वर्ष ही बंद असल्यामुळे सलग चार वर्ष कारखाना बंद असल्यामुळे काहीशे बदल करावायाचे आहेत. शासनाचे मार्गदर्शन मिळेलच फक्त राजगडच्या मागील चालू असणाऱ्या हंगामातील सलग तीन वर्ष ऊस उत्पादक सभासद असावा तो निवणूकीस उभे राहण्यास पात्र असेल व आरक्षण असलेल्या जागासाठी फक्त सभासद असणे गरजेचे आहे. असा ठराव करण्यात आला आहे.
यावेळी उपाध्यक्ष पोपटराव सूके , संचालक किसनराव सोनवणे , शिवाजीराव कोंडे , प्रतापराव शिळीमकर , दिनकर धरपाळे , दत्तात्रय चव्हाण , शोभा जाधव , सुरेखा निगडे , सुभाष कोंढाळकर , चंद्रकांत सागळे ,बाळासाहेब गरूड,अतुल किंद्रे , पं.स.सदस्य रोहन बाठे ,व सर्व संचालक मंडळ , सभासदांची उपस्थिती होते .
मुख्यमंत्री यांच्या शद्बावर विश्वास ठेवून प्रयत्न करीत आहे. कागदपत्राच्या त्रुटी येत होत्या. सध्या चाललेल्या तर्कवितर्क चर्चेवर उत्तर देणे गरजेचे वाटत नाही. जुन्या युनीटला करोडो रूपये खर्च करून रिझल्ट मिळण्याची शंका आहे. हा प्रकल्प खाजगी उदयोगाच्या निगडीत नसुन तो सर्वसामान्य शेतकऱ्यांशी निगडीत असल्यामुळे प्रकल्प लवकर ४६७ कोटी कर्जाला मंजुरी मिळेल.
संग्राम थोपटे, अध्यक्ष राजगड कारखाना

