
भोर -चंद्रकांत जाधव : शासनाच्या विविध कृषी योजना, पीकविमा, नैसर्गिक आपत्तीमधील मदत तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करून फार्मर आयडी तातडीने काढून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती ई-पिक पाहणीच्या माध्यमातून वेळेत नोंदविणे आवश्यक आहे. तसेच फार्मर आयडी तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या कृषीविषयक प्रणालीमध्ये उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात विविध योजनांचा लाभ घेताना आवश्यक प्रक्रिया सुलभ होण्याची शक्यता आहे.
ई-पिक पाहणी व फार्मर आयडीबाबत काही अडचणी असल्यास संबंधित महसूल कर्मचारी, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामस्तरावरील यंत्रणेशी संपर्क साधावा. कोणताही शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनीही शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे, असे तहसीलदार नजन यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी व फार्मर आयडीची प्रक्रिया अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

