
भोर-चंद्रकांत जाधव..घर संसार सांभाळता सांभाळता महिला घरामध्ये विविध कला साकारत असतात.मात्र या कलागुणांना वाव मिळत नसल्याने महिलांना दैनंदिन जीवनात प्रकाश झोतात येता येत नाही.भोर शहरात गौरी गणपती सजावट स्पर्धेतून बहुतांशी महिलांना स्वतःचे कलागुण स्पर्धेतून व्यक्त करता आले.दरम्यान महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती असे मत आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोर शहर यांच्या सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी व्यक्त केले.

गणेशोत्सव काळात गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत बहुतांशी स्पर्धकांनी भाग घेऊन आपापली सजावट उत्कृष्ट केली होती.या सजावटीची पाहणी आयोजकांकडून करून स्पर्धेतील विजेते घोषित करण्यात आले होते. स्पर्धकांना एलईडी टीव्ही,फ्रिज,वॉशिंग मशीन,पिठाची गिरणी,वॉटर फिल्टर,शेगडी ,ज्यूस मिक्सर,डिनर सेट, इस्त्री तसेच कुकर अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली होती.त्याप्रमाणे विजेत्या स्पर्धक भारती महेश गिमवेकर,वैशाली पराग पळशीकर,रूपाली संजय तांबे,नितीन चंद्रकांत निगडे,पल्लवी सुशांत मोहिते,वैशाली लहुदास सागळे,आरती शिंदे,मेघा तारु,अर्चना निलेश कोंढाळकर,अश्विनी विशाल कांबळे यांना बक्षीस देण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, माजी नगराध्यक्षा निर्मला आवारे,नगरसेवक केदार देशपांडे,कुणाल धुमाळ,शहराध्यक्ष संदीप शेटे,कार्याध्यक्ष सोमनाथ ढवळे,नितीन सोनावले,ऋषभ आवारे , अमित जाधव, प्रसाद महाजन आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

