![]()
(भोर-चंद्रकांत जाधव) : राम ओढ्यावरील नव्याने केलेल्या पुलावर अवजड ( डंपर ) खचल्याने भोर – रामबाग रोडवर दोन तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांना ञास सहन करावा लागला. वाहनाच्या रांगा हटवण्यासाठी पोलिस प्रशासनास मोठी दमछाक करावी लागली.

भोर शहराच्या रहदारीच्या असणाऱ्या भोर – महाड रस्त्यावरील रामबाग ओढ्यावर नव्याने पुलाची उभारणी करण्यात आली असून ठेकेदाराने नागरिकांना वाहन चालकांना पूर्वसुचना न देता बांधण्यात आलेल्या पुलावरून वाहतूक अचानक वाहतूक सुरू केली असल्यामुळे भोरच्या मंगळवार ( दि. २९) रोजी आठवडे बाजार दिवशी या अवजड ( डंपर ) पुलावर खचला असल्याने या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे चौपाटी तसेच एस टी स्टँड रोड , उञौली पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना ञास सहन करावा लागला. दोन तास झालेल्या वाहतूक कोंडी सुरूळीत करण्यासाठी भोर पोलिस वाहतूक कर्मचारी यांना मोठी दमछाक करावी लागली.
भोर – महाड रस्त्याचे रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी अर्धवट कामे ठेकेदार करत आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याचे दिशादर्शक फलक , सुचना फलक लावले जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांची फसगत होऊन अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले .

