
भारतासह पाच देशांतील स्पर्धकांचा सहभाग; गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
(भोर – चंद्रकांत जाधव).. ‘बिग बटरफ्लाय मंथ’ निमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चि. निशिगंध स्वप्निल कांबळे याने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. भारतासह दुबई, जपान, कॅनडा आणि चीन या देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत निशिगंधने आपल्या कामगिरीच्या जोरावर यश मिळविले.

निशिगंधच्या या यशामुळे गावाच्या नावलौकिकात भर पडली असून, त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणे ही गावासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

निशिगंधने मिळविलेल्या या यशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही त्याने विविध क्षेत्रांत अशीच यशस्वी कामगिरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

