
(भोर – चंद्रकांत जाधव) एकाच दिवशी, एकाच वेळी ‘ज्ञान माऊली’ या भक्तिमय संगीतमय वाड्मय मधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वा सोहळा थाटात पार पडला.
भोर येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय मध्ये ‘ज्ञान माऊली’ या भक्तिमय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकारातून या अभिनव संकल्पनेतून तहसिलदार राजेंद्र नजन यांच्या हस्ते या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे , नगराध्यक्ष रामचंद्र आवारे , अमर बुदगुडे, राजेश बोडके, ज्ञानेश्वर शिंदे , माऊलींच्या रथापुढे १९ नंबर बाळकृष्ण बुवा भोरकर दिंडीतील सर्व वारकरी ,भाविक, नागरिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनकार्य, साहित्य, विचार आणि आध्यात्मिक संदेश संगीत, अभंग, नृत्य, नाट्य व विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून उपस्थित श्रोत्यांसमोर मांडण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने निवेदन ह.भ.प.शंकर महाराज शिंदे, रामदास महाराज चऱ्हाटे, किसन महाराज पिलाने, सुनील महाराज राजिवडे आदित्य महाराज दिवेकर , जितेंद्र महाराज बांदल, दशरथ आबा कुडपणे, साहिल महाराज महाले, कुमार महाराज गोरड, श्रेयस महाराज म्हस्के, ह.भ.प.ऋषिकेश महाराज शिंदे व सत्यवान महाराज हिरगुडे यांच्या सादरीकरणातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग वाणीने आणि भक्तिमय सादरीकरणाने कार्यक्रमस्थळी आध्यात्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

