
पोलिसांच्या वारंवार सूचना देऊनही उपद्रव सुरूच ठेवल्याने यवत पोलिसांची कारवाई..

प्रतिनिधी.. वरवंड ( ता. दौंड ) येथील गावातील मुख्य चौकात विनापरवानगी मोठ्या आवाजात डीजे साउंड सिस्टीमवर गाणी लावून सार्वजनिक ठिकाणी नाचणे सहा जणांना भोवले आहे. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही हा उपद्रव सुरू ठेवल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीन डीजे वर कारवाई करण्यात आली आहे.
ही घटना शनिवार दि, १० रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.या कारवाईत उपस्थित असणाऱ्या डिजे चे साहित्य जप्त करून पाटस पोलिस चौकीत आणून ठेवण्यात आले आहे.मात्र पोलिस चौकीत एक डीजे आणून लावल्यात आला आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरवंड ( ता. दौंड ) गावच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संबंधित आरोपींनी कोणतीही परवानगी न घेता डीजे साउंड सिस्टीमवर मोठ्या आवाजात गाणी लावली होती. तसेच या गाण्यांवर सार्वजनिक ठिकाणी नाचत उपद्रव सुरू ठेवला होता. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी उपद्रव सुरूच ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद उद्धव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तौफिक मोहम्मद बागवान (रा. फलटण, ता. फलटण, जि. सातारा), हनुमंत झुंबर घाडगे (रा. लोणी देवकर, ता. इंदापूर, जि. पुणे ), स्वप्निल दत्तात्रय डमे ( रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे ), धनंजय मारुती फरगडे, शुभम दादासो दिवेकर, अभिषेक दिवेकर ( तिघेही रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार फणसे करीत आहेत.

