
ढोल-ताशांच्या गजरात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न
पुणे: पुण्यातील सुवर्ण व्यवसायात ३० वर्षांहून अधिक काळाचा विश्वास आणि गुणवत्ता जपणाऱ्या ‘गजलक्ष्मी ज्वेलर्स’च्या नव्या भव्य दालनाचा उद्घाटन सोहळा हडपसर, मगरपट्टा रोड येथे १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. चंदननगरनंतरचे हे गजलक्ष्मी ज्वेलर्सचे ६ वे दालन असून, उद्घाटनप्रसंगी भक्तिमय वातावरणातील पारंपरिक भजन आणि ढोल-ताशांचा दणदणाट यामुळे संपूर्ण हडपसर परिसर दुमदुमून गेला होता.
या मंगलप्रसंगी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, प्रसिद्ध मराठी अभिनेते अंकुश चौधरी, गजलक्ष्मी ज्वेलर्सच्या ब्रँड ॲम्बेसेडर ओजस्विनी कोंढरे यांच्यासह गजलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक जगदीश सोनी, किसन वर्मा, निरंजन सोनी, पवन सोनी आणि देवेंद्र सोनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच राजकीय, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनानिमित्त ‘६ का सिक्सर बंपर ऑफर’ (११ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६)
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी खास उद्घाटनाची भेट म्हणून पुढील ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत:
सोन्याच्या घडणावळीवर (Gold Making Charges): केवळ ४.९९% पासून सुरू
डायमंड दागिन्यांच्या घडणावळीवर: १००% पर्यंत सूट (Upto 100% OFF)
भव्य लकी ड्रॉ बक्षिसे:
६ भाग्यवान ग्राहकांना डायमंड रिंग्स (6 Diamond Rings)
६६ ग्रॅम सोने जिंकण्याची संधी (66 Gram Gold)
६६६६ ग्रॅम चांदी जिंकण्याची संधी (6666 Gram Silver)
६६,६६६ गिफ्ट व्हाउचर ( 66,666 Gift Voucher)
“शुद्धता, आधुनिक डिझाईन आणि ग्राहकांचे समाधान हीच आमची प्राथमिकता आहे. चंदननगरच्या यशानंतर हडपसरमध्ये सुरू केलेल्या या ६ व्या दालनामुळे पूर्व पुण्यातील ग्राहकांना त्यांच्या आवडीचे दागिने खरेदी करणे अधिक सुलभ होईल.
असा विश्वास संचालक पवन सोनी आणि किसन वर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.

