
छत्रपती संभाजीनगर – छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विलासभाऊ पांगारकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी डॉ. पांगारकर यांनी सिंहस्थाचे प्राचीन स्थान असलेल्या श्रीक्षेत्र कावनाई-कपिलधारा (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथे आगामी दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याचे अधिकृत आमंत्रण मनोज दादा जरांगे पाटील यांना दिले.

कावनाई हे गजानन महाराजांची तपोभूमी व सिंहस्थाचे प्राचीन स्नान स्थान असून, या ध्वजारोहण सोहळ्यापासूनच सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या कार्याला प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून साधू-महंत व लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. या भेटीदरम्यान डॉ. पांगारकर यांनी जरांगे पाटील यांना प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले असून, मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठीच्या त्यांच्या लढ्याला छावा भारत क्रांती मिशनचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.

यावेळी जरांगे पाटील यांनीही कावनाई ध्वजारोहण सोहळ्याच्या निमंत्रण दिल्या बद्दल आभार व्यक्त केले.

