![]()
(भोर- चंद्रकांत जाधव).. भोर तालुक्यातील बारे खुर्द येथील गौतम नगर येथे रस्त्याच्या कडेला अतिक्रमण आहे त्यामुळे अनेकांना या ठिकाणी जीवघेणी सामना करावा लागत आहे यासाठी अतिक्रमणे काढावी यासाठी गटविकास अधिकारी व अन्य शासकीय अधिकारी यांनी योग्य ती दखल घेतली नसल्याने मी बारे खुर्द येथील सरपंच सविता गायकवाड तहसील कार्यालयासमोर उपोषणास करणार असल्याचे निवेदन शासकीय अधिकारी यांना देण्यात आले.
बारे खुर्द येथील ग्रामस्थ रघुनाथ सिताराम भालेराव हे मुद्दामहून अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ करतात त्यांना कुणाचा वरदहस्त आहे हा खरा प्रश्न आहे? पण गटविकास अधिकारी हे झोपल्याचे सोंग घेत आहेत रघुनाथ सिताराम भालेराव यांचा मुलगा हा पोलीस पाटील असून ते गावात तंटा मिटवण्याऐवजी भांडणे वाढवण्याचे प्रयत्न करतात.
बारे खु पोलीस पाटील हे आपल्या पदाचा गैरवापर करून पंचायत समिती मधून मंजूर झालेली विहीर स्वतः खोदून घेतली परंतु हे काम त्यांनी जेसीबी सहाय्याने केले व शासनाची फसवणूक करून आर्थिक बिले काढले त्यामुळे ज्यांच्या नावे विहीर आहे व खोटी बिले काढली त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी सरपंच यांनी मागणी केली आहे.
बारे खुर्द गौतम नगर येथील अतिक्रमणे काढा अनेक वेळा सरपंच यांनी निवेदन दिली तहसीलदार प्रांत अधिकारी यांचे सहकार्य नेहमीच राहिले परंतु गटविकास अधिकारी यांना हे अतिक्रमण काढण्यास काय अडचण आहे हे समजत नाही जर अतिक्रमण काढणार नसेल तर येथे १५ दिवसात मी सरपंच सविता गायकवाड भोर येथिल तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन देण्यात आले.

