
कथित आर्थिक देवाणघेवाण केल्याप्रकरणी तब्बल सहा वरिष्ठ आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आलीय…
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुण्यातील कार्यालयातून खळबळजनक बातमी समोर आलीय….उद्योगांना उभारणी (CTE) आणि संचालनासाठी (CTO) परवानगी देण्याच्या प्रक्रियेत कथित आर्थिक देवाणघेवाण केल्याप्रकरणी तब्बल सहा वरिष्ठ आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आलीय…
निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे, उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे, तसेच क्षेत्रीय अधिकारी सुषमा कुंभार, क्षेत्रीय अधिकारी जयंत डोके आणि क्षेत्रीय अधिकारी अजय खामकर यांचा समावेश आहे.
उद्योगांना परवानग्या देण्याच्या मोबदल्यात झालेल्या कथित आर्थिक व्यवहारांच्या तक्रारींसोबत थेट व्हिडिओ पुरावे सादर करण्यात आले होते. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासे मागवण्यात आले होते; मात्र हे खुलासे असमाधानकारक असल्याचे सांगत सक्षम प्राधिकाऱ्यांनी ते फेटाळून लावले. अखेर कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तनाचा ठपका ठेवत या सर्व सहा अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीच्या अधीन राहून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

