
हातवळणमध्ये नवजात अर्भक आढळल्याने खळबळ
दौंड : प्रतिनिधी… दौंड तालुक्यातील हातवळण येथे नवजात अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. याबाबतची माहिती यवत पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक सुधीर कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पोलिसांनी आरोग्य विभागाच्या मदतीने नवजात अर्भकाला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे पाठविले आहे. ससून हॉस्पिटल येथील तपासणी अहवाल आल्यानंतर याबाबत अधिक तपास होणार आहे.या घटनेबाबत यवत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, अर्भक येथे कसे आले, किती महिन्याचे आहे, तसेच हे कोणी आणून टाकले याबाबतची माहिती तपासातून समोर येणार आहे.

