
भोर- चंद्रकांत जाधव…. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असून त्याच्या उत्पादन खर्चात बचत व्हावी आणि शेतीसोबतच पशुपालनापासून उत्पन्नाचे अतिरिक्त साधन निर्माण व्हावे या उद्देशाने भोर तालुका विक्री संघाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात.निश्चितच हे प्रयत्न शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याने भोर खरेदी विक्री संघ शेतकऱ्यांचे हीत जोपासणारा आहे असे मत माजी आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.

भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पशुपालनासाठी पशुखाद्य उपलब्ध केल्याच्या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार थोपटे सोमवार दि.२१ बोलत होते.यावेळी चेअरमन सोमनाथ सोमाणी, व्हा.चेअरमन संपत दरेकर,अतुल किंद्रे,अतुल शेडगे विजय शिरवले,विठ्ठल खोपडे,बबन जाधव,किशोर बांदल,नरेश चव्हाण,सुजाता जेधे,नंदा मोरे,दिलीप वरे,मधुकर कानडे,नथु दामगुडे,सभासद,शेतकरी उपस्थित होते.
माजी आमदार थोपटे पुढे बोलताना म्हणाले शेतकरी बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा व पशुखाद्य वाजवी दरात उपलब्ध व्हावे.तसेच पशुपालन व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मुंबई या शासकीय कंपनीचे भोर खरेदी विक्री संघात पशुखाद्य विक्री सुरू करण्यात आली आहे.पुढील काळातही शेतकऱ्यांच्या हितासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.

